मुंडे अडचणीत, आयकर खात्याची नोटीस

गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 3, 2013, 09:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च करून निवडून आल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवून २० दिवसात उत्तर देण्याची मागणी केलेली आहे.
आता प्राप्तीकर विभागानेही मंगळवारी मुंडे यांना नोटीस पाठवत मालमत्तेबाबत तपशील देण्यास सांगितले आहे. कारण, त्यांनी आपली एकूण संपत्ती २ कोटी रुपये असून, लोकसभा निवडणुकीत १९ लाख रुपये खर्च केले, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मग आठ कोटी रुपये कोठून आणले, असा प्रश्न निर्माण होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.