मुंबई : अंजली दमानिया यांनी जमिनी बद्दल केलेल्या आरोपांना महसूल मंत्री एकनाथ खडसे जोरदार प्रत्त्युतर दिलंय. पुरावे दिल्यास ताबडतोब राजीनामा, येथेच देईन असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेय.
'झी २४ तास'वर रोखठोक या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका जाहीर केली. दरम्यान पुरावे नसतील तर दमानिया यांनी कोर्टाच्या कारवाईसाठी तयार रहावं, असा इशाराही खडसेंनी दिलाय. शिवाय आरोप करणाऱ्यांचे बोलविते धनी वेगेळच असल्याही खडसेंनी म्हटलंय.
खडसेंच्या जावयांच्या लिमो गाडीचा आरोपनंतर आता अंजली दमानिया यांनी खडसे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे तब्बल २५४ एकर जमीन असल्याचं दमानियांनी म्हटलंय.
एकाच कुटुंबाच्या नावे इतकी जमीन कोठून आली आणि त्यासाठी पैशाच्या स्त्रोत काय? असे प्रश्नही दमानिया यांनी विचारलाय. या संदर्भातले सर्व पुरावे मुख्यमंत्री आणि अॅँटी करप्शन ब्युरोकडे देणार असल्याचंही दमानियांनी म्हटलंय