मुंबई : थर्टी फर्स्टच्या रात्री बेधुंद होऊन डान्स करायचाय आणि भरपूर दारू देखील प्यायचीय... पण घरी जाताना गाडी कोण चालवणार किंवा घरी सुखरूप नेऊन कोण सोडणार, अशी अडचण आहे? तर अजिबात टेन्शन घेऊ नका... 'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह' अशी मोहीमच मुंबईतल्या अनेक संस्थांनी सुरू केलीय.
सध्या सगळीकडं चर्चा आहे ती थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर पार्टीची... त्यासाठी पब, डिस्को, हॉटेल्स सगळीकडे बुकींग सुरु झालंय. पण थर्टी फर्स्टला भरपूर दारू प्यायचा तुमचा प्लान असेल तर आणखी एका गोष्टीचं बुकिंग करायला विसरू नका... दारू प्याल्यानंतर तुम्हाला घरी सोडण्यासाठी गाडी आणि ड्रायव्हरचं बुकिंग... पार्टी हार्ड ड्रायव्हर्स, पार्टी क्लब ड्रायव्हर्स, विंग्ज ड्रायव्हर्स या अनेक संस्था तुम्हाला पाहिजे तिथं गाडी आणि ड्रायव्हर उपलब्ध करून देतात.. पार्टी जाण्याआधी तुम्ही तुमचा पत्ता आणि पिकअप पॉईंट फक्त नोंदवून ठेवायचा... 31 डिसेंबरला राञभर ही सेवा सुरु असेल.
‘दारु प्यायल्यावर कस्टमर आपला पत्ता ते विसरतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून आधीच पत्ता आणि नंबर घेतो. इतना भी नहीं पीना चाहिए की होश खो बैठो...’ असं ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर्स’चे सौरभ शर्मा म्हणतायत.
या संस्थांकडे ड्रायव्हर्ससाठी जवळपास 40% बुकिंग झालंय. पण यात 18 ते 25 वयोगटातल्या तरुणांचं बुकिंग अत्यंत कमी आहे. दारु पिउन गाडी चालवणं कायद्यानं गुन्हाच आहे. 31 डिसेंबरला रात्री पार्टीत दारु प्यायल्यावर गाडी चालवून स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात न घालता तुमच्याकडे पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
1) 31 तारखेला रात्री स्वत:ची गाडी न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. उदा. बस, रिक्षा, टॅक्सी, ट्रेन
2) ड्रायव्हर भाड्याने घ्या... त्यासाठी आतापासूनच बुकिंग करा
3) तुम्ही पार्टीला जाणार असलेल्या आयोजकाकडे गाडीची व्यवस्था करण्याची मागणी करा
4) तुमच्या पालकांना किंवा इतर नातेवाईकांना पार्टीसाठी गेलेल्या ठिकाणाची माहिती देऊन ठेवा
5) तुमच्या ओळखीतील दारु न पिणाऱ्या व्यक्तीला सोबत ठेवा
नवीन वर्षाचं स्वागत मजा मस्ती करत आणि जल्लोषात करायचं असेल तर एकच करा... इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह... 31 डिसेंबरला राञी दारु पिउन गाडी न चालवता ट्रांसपोर्टचे अने पर्याय उपल्यब्ध आहेत. त्यामुळे न्यू यिअर सेलिब्रेशनच्या मुडमध्ये गाडीचा अपघात टाळायचा असेल तर लगेचच तयारी करायला सुरुवात करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.