मुंबई : माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी पदावर राहणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजु मांडली. मात्र, पत्रकारांच्या पत्रांना उत्तर न देता निघून गेलेत.
दरम्यान, त्याआधी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणालेत, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, ते तथ्यहीन आहेत. मात्र, मागील काही दिवसापासून माध्यमांतून होत असलेला आरोप व पक्षाची नैतिक मूल्यांची परंपरा पाहता निर्दोषत्त्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर राहणार नसल्याची भूमिका घेऊन खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची भूमिका व्यक्त केलेय.
भारतीय जनता पक्ष खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे आहे असेही दानवे यांनी स्पष्ट केले. खडसे यांनीही राजीनाम्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच आपल्याविरोधात मीडिया ट्रायल सुरु आहे. माझ्यावर खोटे आरोप केले गेले आहेत. मी ४० वर्षे राजकारणात आहे. अनेक चढ उतार पाहिलेत. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही या भूमिकेतून राजीनामा देणार आहे, असे खडसेंनी सांगितले.
आज सकाळापासूनच मुख्यमंत्री खडसेंना अधिकृतपणे राजीनामा देण्याचा आदेश देणार असल्याची चर्चा रंगली होती. काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांनी चर्चा केल्यानंतर थेट पत्रकार परिषद घेतली.
- मुंबई : मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, राजीनामा देण्याचे त्यांच्याशी बोललोय - खडसे
- मुंबई : हॅकर हा चोर आहे. चोरावर विश्वास ठेवता तुम्ही, पाकिस्तानची साईट हॅक करणं हा गुन्हा - खडसे
- मुंबई : मी मुख्यमंत्री यांच्याकडेच चौकशी मागणी केलेय - खडसे
- मुंबई : मी ११९ महत्वाचे निर्णय घेतले, मी कोठेही लपून बसलेलो नाही : खडसे
- मुंबई : सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी राहणार नाही - खडसे
- मुंबई : भ्रष्टाचाराची मीडिया ट्रायल, माझ्याविरोधात एकही पुरावा नाही : खडसे
- मुंबई : खडसेंवरील आरोपांमध्ये तथ्य नाही - दानवे - खडसेंच पक्षवाढीमध्ये मोठं योगदान - दानवे
- मुंबई : गेले ४० वर्ष संघर्ष करीत मी इथपर्यंत पोहोचलोय : खडसे
- मुंबई : पुरावा द्या, मी राजकारण सोडून देईन : एकनाथ खडसे
- मुंबई : खडसेंनी राजीनामा दिलेला नाही, केवळ मनोदय व्यक्त केलाय - दानवे
- मुंबई : खडसेंच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून स्पष्टीकरण
- मुंबई : भाजपची पत्रकार परिषद सुरू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह एकनाथ खडसेही उपस्थित