मुंबई: सासऱ्यानं सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा इथं घडली़य.
पीडित १९ वर्षीय तरुणी नुकतीच बुलडाण्याहून मुंबईत आली होती. पती आणि सासऱ्यासोबत ती महिन्याभरापासून इथं राहत होती. या प्रकारामुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
तिचा पती बिगारीचं काम करतो, बुधवारी तिचा नवरा कामाला गेल्याची संधी साधून सासऱ्यानं हे कृत्य केलं. तसॉंच कोणालाही याबाबत सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकीही दिली. तरीही तिनं घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला.
अखेर या दोघांनीही पोलीस ठाण्यात तक्रार केलीय. दरम्यान सासरा पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.