बारावीचा पेपर वेळेआधीच व्हॉटसअपवर आला होता?

बारावीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली. 

Updated: Mar 3, 2017, 03:29 PM IST
बारावीचा पेपर वेळेआधीच व्हॉटसअपवर आला होता? title=

मुंबई : बारावीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली. 

गुरुवारी म्हणजे काल बारावीचा मराठीचा पेपर होता... आणि तो गुरुवारीच वॉट्सअप वर फिरवण्यात आला. त्यामुळे हा मेसेज परीक्षेच्या कालावधी आधी सोशल मीडियावर आली की नंतर याबाबत संभ्रम आहे. 

हा संभ्रम दूर करण्यासाठी हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे देण्याचा निर्णय बोर्डानं घेतला.