हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत

 देशात दादरी प्रकरणावरून धार्मिक तेढाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि माणुसकीचा प्रकार मुंबईत पाहायला मिळाला आहे. मिडे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदू भक्तांच्या एका ग्रुपने मुस्लिम महिलेला बाळाला जन्म देण्यास मदत केली आहे. या महिलेने वडाळ्यातील गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला. 

Updated: Oct 5, 2015, 04:39 PM IST
हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत  title=

मुंबई :  देशात दादरी प्रकरणावरून धार्मिक तेढाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि माणुसकीचा प्रकार मुंबईत पाहायला मिळाला आहे. मिडे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदू भक्तांच्या एका ग्रुपने मुस्लिम महिलेला बाळाला जन्म देण्यास मदत केली आहे. या महिलेने वडाळ्यातील गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला. 

नूरजहाँ शेअर असे या महिलेचे नाव असून प्रसुतीसाठी रुग्णालयात जात असताना टॅक्सीमध्ये तिला प्रसुती वेदना ( लेबर पेन) सुरू झाल्या. आपल्या टॅक्सीमध्येच महिलेची प्रसुती होईल म्हणून तो घाबरला आणि त्याने टॅक्सीमधून त्या महिला बाहेर काढले. 

इलायास शेख यांच्या पत्नीला ५ ऑक्टोबर डिलेव्हरीची तारीख दिली होती. पण त्यांच्या पत्नीला कालच पहाटे साडे चार वाजता पोटात दुख लागलं होतं. त्यामुळे शेजारच्या एका महिलेसह इलियास यांनी पत्नीला टॅक्सीमधून हॉस्पिटलमध्ये नेण्याचं ठरवलं. 

महिलेला कारमधून बाहेर काढल्यावर या मुस्लिम महिलेला समोरच असलेल्या गणपती मंदिरात बसलेल्या हिंदू महिलांनी पाहिले. या महिलांनी त्या मंदिराला डिलेव्हरी रूमचे स्वरूप दिले. त्यांनी साड्या, बेडशीट आणि इतर वस्तू आणल्या. या महिलेने सुखरूप एक गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला. त्यानंतर दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

यानंतर डॉक्टरांनी दोघांची प्रकृती तपासली असता, दोघांच्या प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.