सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप

नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

Updated: Apr 15, 2015, 06:07 PM IST
सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप title=

मुंबई : नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

प्राण्यांना कोणतीही राजकीय मतं नसतात. कोंबड्या या पृथ्वीतलावरचा सर्वात शांत पक्षी आहे. असं असताना राजकीय उत्साह दाखवताना त्यांचे हाल कशाला असा सवाल पेटाने विचारला आहे. 

2012 मध्ये पेटाने केलेल्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आय़ोगाने प्रचारादरम्यान प्राणी न वापरण्याचे निर्देश सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. 

तसंच या निर्देशांचं उल्लंघऩ करणा-या राजकीय पक्षांवर कारवाईचे संकेतही निवडणूक आय़ोगाने दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.