दहा वर्षांत तिसऱ्यांदा जुलैमध्ये अधिक पाऊस

गेल्या दहा वर्षांचा (२००७) विचार करता २०१० आणि २०१३ नंतर यंदा तिसऱ्यांदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१० मध्ये जुलै महिन्यात १०२.८ टक्के, तर २०१३ मध्ये १०७.३ टक्के पाऊस पडला होता. 

Updated: Aug 6, 2016, 11:23 AM IST
दहा वर्षांत तिसऱ्यांदा जुलैमध्ये अधिक पाऊस title=

मुंबई : गेल्या दहा वर्षांचा (२००७) विचार करता २०१० आणि २०१३ नंतर यंदा तिसऱ्यांदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१० मध्ये जुलै महिन्यात १०२.८ टक्के, तर २०१३ मध्ये १०७.३ टक्के पाऊस पडला होता. 

तर जुलै २००८ मध्ये सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या ८३.५ टक्के पाऊस पडला होता. विशेष म्हणजे १९७० पासूनच्या ४६ वर्षांमध्ये तब्बल ३४ वर्षे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. 

यंदा जुलै महिन्यात उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.