मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतला.
यानंतर काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी देखिल अर्ज मागे घेतला आहे. यावरून भाजपचे हरिभाऊ बागडे हे विधान सभेचे नवे अध्यक्ष असतील.
मतफुटीच्या भीतीने शिवसेना आणि काँग्रेसने माघार घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासदर्शक ठरावावर दुपारी तीन वाजता मतदान पार पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बिनविरोध