ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन

पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Jan 17, 2016, 07:08 PM IST
ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन title=

मुंबई : पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

गुलाम अलींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटरवरुन दिली. दरम्यान, आव्हाडांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी गुलाम अलींना ठाण्यात बोलावूनच दाखवावे असे आव्हान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांना दिले आहे.

'शिवसेनेला जे करायचय ते करु दे', अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. पाकिस्तानी कलाकरांचे महाराष्ट्रात कार्यक्रम आयोजित करण्यास शिवसेनेचा प्रखर विरोध असून, मागच्यावर्षी शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा लागला होता.