राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम

राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. 

Updated: Dec 2, 2016, 08:08 AM IST
राज्यात भूजल पातळीत वाढ, तरीही काही ठिकाणी पाणीटंचाई सामना कायम title=

मुंबई : राज्यातील भूजल पातळी यंदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा फक्त ६४४ गावांमध्ये पाणी टंचाई असेल. राज्यातील बहुतेक सर्व भागांत यावेळी समाधानकारक पाऊस झाला असल्याने राज्यात भूजल पातळीमध्ये समाधानकारक सुधारणा झाली आहे. 

जलयुक्त शिवार, नद्या - नाले यांचे खोलीकरण यांसारख्या उपक्रमांमुळे पाणी जमिनीत झिरपण्यात चांगली मदत झाली आहे. त्यामुळे भुजल पातळीच्या बाबातील गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याची परिस्थिती समाधानकारक आहे, पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार नाही. 

असे असलं तरी धुळे, नंदुरबार, जळगांव तसंच औरंगाबाद - नगरचा, सांगलीच्या काही भांगात पावसाचे अस्तित्व राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत कमीच होते. यामुळे यंदा सुमारे ६०० पेक्षा जास्त गावांमध्ये भूजल पातळीमध्ये फारसा फरक न पडल्यानं डिसेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.