लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा प्रथम स्मृतिदिन

एखाद्या नेत्याचं आकस्मिक निधन झाल्यानं पोकळी निर्माण होते असं सर्रास बोललं जातं. मात्र हे वाक्य लोकनेता असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत आज शब्दश: खरं ठरलं आहे. मुंडेनंतरचा भाजप आज खाचखळगे खात एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे, असं मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं म्हणावं लागेल.

Updated: Jun 3, 2015, 04:05 PM IST
लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा प्रथम स्मृतिदिन  title=

मुंबई: एखाद्या नेत्याचं आकस्मिक निधन झाल्यानं पोकळी निर्माण होते असं सर्रास बोललं जातं. मात्र हे वाक्य लोकनेता असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत आज शब्दश: खरं ठरलं आहे. मुंडेनंतरचा भाजप आज खाचखळगे खात एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे, असं मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं म्हणावं लागेल.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा धक्का राजकीय दृष्टया फक्त भाजपाला बसला नाही तर तो इतर पक्षांनाही बसला होता. कारण सर्वमान्य नेता असलेल्या मुंडे यांची वैशिष्ट्येच त्याला कारणीभूत होती.

समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणारा नेता... सर्व राजकीय पक्षांशी ख़ास करून शिवसेना आणि घटक पक्षांशी थेट चर्चा करुन निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता. शेतकरी - ग्रामीण भाग - शहरी भाग यांच्याशी घट्ट नाळ जोडलेला नेता...राज्याबरोबर राष्ट्रीय पातळीवरही वजन असलेला नेता, अशी मुंडेंची वैशिष्ट्ये होती. 

मात्र मुंडे यांच्या निधनानंतर इतर पक्षांशी, शिवसेना आणि घटक पक्षांशी भाजपाचे संबंध बिघडत गेले. राज्यात हे वातावरण सत्ता आल्यावरही कायम राहिलं आहे.

मुंडे असते तर ही परिस्थिति उद्भवली नसती आणि वादही झाले नसते असं जवळपास सर्वच घटक पक्षांचं म्हणणं आहे. हे वाद इथंच थांबत नाहीत तर भाजपमध्ये नवे गट स्थापन होत अंतर्गत वादही सुरु झाले असून धुसफुस कायम आहे.

या वादांमध्येच धनगर आरक्षण, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा वादांची भर पडली असून थेट भाजप सरकारला टार्गेट करणं सुरू झालं आहे. त्यामुळं भाजपची डोकेदुखी मुंडे गेल्यावर वाढली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.