मॅगीचे दमदार कमबॅक, ५ मिनिटांत ६० हजार किट्सची विक्री

 न्यायालयानं मॅगी विक्रीवरील बंदी उठवताच ऑनलाईन शॉपींगसाईटवर मॅगीनं दमदार कमबॅक केलंय. स्नॅपडील ऑनलाईन शॉपींगसाईडवर अवघ्या ५ मिनिटांत मॅगीच्या तब्बल ६० हजार वेलकम किट्सची विक्री झाली.

Updated: Nov 13, 2015, 10:32 AM IST
मॅगीचे दमदार कमबॅक, ५ मिनिटांत ६०  हजार किट्सची विक्री  title=

मुंबई : न्यायालयानं मॅगी विक्रीवरील बंदी उठवताच ऑनलाईन शॉपींगसाईटवर मॅगीनं दमदार कमबॅक केलंय. स्नॅपडील ऑनलाईन शॉपींगसाईडवर अवघ्या ५ मिनिटांत मॅगीच्या तब्बल ६० हजार वेलकम किट्सची विक्री झाली.

न्यायालयाने मॅगीवरील सर्व आरोप फेटाळून लावल्यानंतर पाच महन्यांत मॅगीनं कमबॅक केलं होतं. त्यानंतर ऑनलाईन शॉपीवर मॅगीचे वेलकम किट्स उपलब्ध झाले होते. 

नेस्ले’च्या मॅगीमध्ये शिस्यांचं प्रमाण अधिक आढळल्याने बंदी आणली गेली होती. १२ पॅकेज मॅगी, २०१६चे मॅगी कॅलेंडर, मॅगी फ्रिंज मॅग्नेट, मॅगी पोस्टकार्ड आणि वेलकम बॅकचं पत्र, असं मॅगीचं किट्स आहे. याची नोंदणी ९ नोव्हेंबरला सुरु झाली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.