शिवसेनेबरोबर संबंध चांगलेच : मुख्यमंत्री फडणवीस

सध्या जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तथ्य नसल्याचे सांगून शिवसेनेबरोबर चांगलेच संबंध असल्याचे म्हटले.

Updated: May 20, 2015, 11:22 PM IST
शिवसेनेबरोबर संबंध चांगलेच : मुख्यमंत्री फडणवीस title=

मुंबई : सध्या जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तथ्य नसल्याचे सांगून शिवसेनेबरोबर चांगलेच संबंध असल्याचे म्हटले. माझे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर नेहमी चर्चा होत असते, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. युती सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ही कबुली दिली. आमचे सहकारी पक्षांची चांगले संबंध आहेत. आम्ही जे निर्णय घेतो ते एकमतानेच असतात. आमच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरविल्या जाता आहेत. सर्वांशी चांगला ताळमेळ आहे. सेनेबरोबरचे संबंधही चांगले आहेत. कोणतेही मतभेद नाहीत. त्याचवेळी भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. आकडेवारीनुसार बघायला गेल्यास आमचे सरकार आल्यावर राज्यातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचे ते म्हणालेत.

मात्र, आकडेवारीनुसार गुन्हेगारीचे आकलन करणे बरोबर नाही, असे सांगून त्यांनी किती गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आमच्या सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

राज्यातील गुन्हेगारी वाढत असून, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी भाष्य केले नाही. मात्र, त्यांनी गुन्हेगारी कमी झाली असल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी अवघी ८ टक्के इतकी होती. आम्ही जाणीवपूर्वक ही टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे ते म्हणालेत. 

राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही चौकशी सुरू आहे. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आम्ही करणार नाही. राष्ट्रवादीने या चौकशी विरोधात कोणतेही आरोप केले तरी सिंचनामध्ये जे घोटाळे झाले आहेत. त्याच्या मुळांपर्यंत गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.

राज्यातील कॉल सेंटरमध्ये सध्या महिलांना रात्रपाळी करण्याची मुभा आहे. यापुढे कारखान्यांमध्येही महिलांना रात्रपाळीत काम करता यावे, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.