मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे. दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस असल्याने हवेत चांगला गारवा आहे. तर आतापर्यंत मराठवाड्यावर रुसलेल्या पावसानं उशीरा का होईना हजेरी लावलीय. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात सगळीकडेच पावसानं गेल्या दोन दिवसांत हजेरी लावलीय.
मुंबई दोन दिवसांपासून पावसाने आपला मुक्काम केला आहे. काही सखल भागात पाणी साचले. वरळी,परळ, दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, ठाणे, मुलुंड, कांदीवली, बोरीवली आदी ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरात पाऊस काहीप्रमाणत आहे. मुंबईत सकाळपासून पुन्हा पावसाला जोर दिसून येत आहे.
कोकणातही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. मराठवाड्यात आतापर्यंत रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात झालीय. शेतकरी आता कपाशीच्या लागवडीसह पेरणीच्या कामाला लागला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत सरासरीच्या 40 ट्क्के पाऊस झाला आहे तर शहरातही पावस तुरळक हजेरी लावत आहे. औरंगाबाद सोबत बीड, उस्मानाबाद, हिंगोली परभणी या शहरातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
बीड जिल्ह्यात सरासरी 11.52 मी.मी, लातूरमध्ये 24.39 मी.मी. तर उस्मानाबादमध्ये 25.74 मी.मी पावसाची नोंद झाली आहे... पुनर्वसू नक्षत्रात झालेला हा पाऊस शेतक-यांसाठी ख-या अर्थाने दिलासादायक ठरला आहे.... उस्मानाबाद आणि बीडमध्ये तर दोन दिवसांच्या पावसानं काही ठिकाणी नदी नाल्यांना सुद्धा पाणी आलं आहे.. सुरुवात संथ असली तरी आता हा पाऊश जोराने व्हावा अशीच आशा बळीराजा करतोय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.