मुंबईकरांसाठी पावसानं आणली गुड न्यूज

गेल्या चार पाच दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबईतली सध्या सुरू असणारी 20 टक्के पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 14, 2016, 08:13 AM IST
मुंबईकरांसाठी पावसानं आणली गुड न्यूज title=

मुंबई : गेल्या चार पाच दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबईतली सध्या सुरू असणारी 20 टक्के पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये 6 लाख 39 हजार 698 दशलक्ष लीटर पाणी जमा झालंय. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा दुपटीपेक्षा जास्त आहे. 

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पाणीसाठ्यात जवळपास दीड लाख दशलक्ष लीटरची वाढ झालीय. त्यामुळे धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहीला, तर पुढच्या आठवड्यात पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवलीय. 

पाणी वर्षभर पुरवायचं असेल, तर 14 लाख 50 हजार दशलक्ष लीटर पाणी साठा आवश्यक असतो. या साठ्याचा निम्मा साठा पुढच्या आठवड्यापर्यंत तयार झाला, तर पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेणं शक्य होईल असं पालिकेच्या सूत्रांनी म्हटलयं.