लोकलमध्ये बॅगेची हेराफेरी करणारी गँग सक्रीय

लोकल ट्रेनमधून ऑफिसला जातांना अनेकांना बॅगवर टाकून झोपण्याची किंवा मग मोबाईलमध्ये स्वत:ला गुंतवून घेण्याची सवय असते. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

Updated: Jul 13, 2016, 11:00 PM IST
लोकलमध्ये बॅगेची हेराफेरी करणारी गँग सक्रीय title=

मुंबई : लोकल ट्रेनमधून ऑफिसला जातांना अनेकांना बॅगवर टाकून झोपण्याची किंवा मग मोबाईलमध्ये स्वत:ला गुंतवून घेण्याची सवय असते. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

लोकल ट्रेनमध्ये चोरी होणं हे काही नवीन नाही. पाकिटमार, हातातून फोन हिसकवून लोकलमधून उड्या मारणारे लोकं रेल्वेत मोठ्या प्रमाणात चोरी करतांना दिसतात. आता आणखी एक गँग रेल्वे प्रवासात सक्रिय झाली आहे जे बॅगेची हेराफेरी करतात.

तुम्ही तुमची बॅग लोकलमधील ट्रॅकवर ठेवतात. येथूनच आता बॅगेची हेराफेरी व्हायला सुरूवात झाली आहे. तुमच्या बॅगेसारखीच दिसणारी बॅग त्या जागी ठिकाणी चोरांची टोळी तुमची बॅग लंपास करते. त्यामधील महत्वाचं सामान जसे की मुद्देमाल, मोबाईल, चार्जर आणि फोटो आयडी चोरले जाते. आणि मग हीच बॅग रिकामी करून दुसरी बॅग चोरण्यास तयार होतात.