शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2017, 12:02 AM IST
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही title=

मुंबई : सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

त्यामुळे रात्रंदिवस रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत टळणार आहे. झी 24 तासने सरकारपर्यंत बळीराजाचा आवाज पोहोचवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. 22 एप्रिलपर्यँत ज्या तुरीची नोंद झाली आहे. त्याची तपासणी करून ती सर्व खरेदी केली जाणार आहे.

सुटीचा दिवस असला तरी तूर खरेदी केली जाणार आहे. सरकारचे विशेषतः मुख्यमंत्र्यांचे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरी तूर ही व्यापाऱ्यांची आहे की शेतकऱ्यांची ही तपासण्यासाठी कमिटी नियुक्त केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा पेरा आणि सरासरी उत्पन्न तपासले जाणार आहे.

खऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या सगळ्यात चतुर व्यापाऱ्यांच भलं होऊ नये ही भूमिका आहे. बारदाण्यामुळे कुठे तूर खरेदी राहू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले गेले आहेत.तूर खरेदीच्या जीआरमध्ये कुठल्या ही जाचक अटी नाहीत. आता विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत म्हणून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.