मुंबईत विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त

मुंबई विमानतळावर विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त करण्यात आलंय. कस्टम अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जेट एअरवेजच्या विमानातील दोन टॉयलेटमधून तब्बल दोन कोटींहून अधिकचं सोनं जप्त केलं.

Updated: Jun 7, 2015, 03:21 PM IST
मुंबईत विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त title=

मुंबई: मुंबई विमानतळावर विमानाच्या टॉयलेटमधून कोट्यवधींचं सोनं जप्त करण्यात आलंय. कस्टम अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जेट एअरवेजच्या विमानातील दोन टॉयलेटमधून तब्बल दोन कोटींहून अधिकचं सोनं जप्त केलं.

यावर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी समजली जातेय. कस्टम अधिकाऱ्यांच्या मते ९ डब्ल्यू ५३९ फ्लाइटच्या दोन्ही टॉयलेटमध्ये ८ किलो सोनं मिळालं. कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला अटक केलीय. सेगू नैना मोहम्मद नावाच्या या व्यक्तीची चौकशी केली असता, त्यानं सोनं लपविल्याचं कबूल केलं. 

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जानेवारीपासून आतापर्यंत मुंबई एअरपोर्टवरून २५० किलो सोनं जप्त करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.