रेल्वेच्या धडकेत गँगमनचा मृत्यू, रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन

ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. माधव स्वामी हे ५४ वर्षाचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक दुरूस्तीचं काम करत होते.

Updated: Dec 15, 2014, 06:08 PM IST
रेल्वेच्या धडकेत गँगमनचा मृत्यू, रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन title=

मुंबई : ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. माधव स्वामी हे ५४ वर्षाचे कर्मचारी रेल्वे ट्रॅक दुरूस्तीचं काम करत होते.

माधव स्वामी यांच्या अपघाती मृत्यूनंतर रेल्वेच्या काही गँगमनने आंदोलन केलं होतं, यामुळे ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे सेवेवर थोडा परिणाम झाला होता.

यापूर्वी ट्रॅकवर गँगमनच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्याकडे रेल्वेप्रशासनानं फार गंभीरपणे पाहिलेलं दिसत नाही, काम सुरू असलेल्या ट्रॅकवर गाडी येतेय, हे गँगमनना लवकर कळत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.