www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.
गेल्या दोन वर्षांतील सलग चौथी दरवाढ असून त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमान्यांना २५ ते ३५ रुपयांचा फटका बसणार आहे. साध्या व जलद सेवेसाठी प्रतिकिलोमीटर २.५० पैसे तर रात्र आणि निमआराम सेवेसाठी ३.३३ पैसे अशी ही दरवाढ आहे.
गेल्या काही महिन्यांत पाच वेळा डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एस.टी.ने मंडळाला वाचविण्यासाठी ही भाववाढ केली आहे.
३० किमी पर्यंतचा प्रवास महाग झाला नसला तरी लांबच्या प्रवाशांचा असा खिसा या भाडेवाढीमुळे कापला जाणार आहे.
साध्या/जलद सेवेच्या पहिल्या ३० कि.मी.च्या प्रवासासाठी भाववाढ करण्यात आली नसून ३१ मे ५४ कि.मी.साठी १ रुपया, ५५ ते ९० कि.मी.च्या प्रवासासाठी २ रुपये आणि ९१ ते १५० किलोमीटरसाठी ३ रुपये अशी भाडेवाढ आहे.
शहरी सेवेच्या पहिल्या ६ किलोमीटरपर्यंत वाढ झाली नसून ६ ते २० कि.मी.साठी १ रुपयाने वाढ झाली आहे. ७ मार्चपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि ७ मार्च रोजी अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणार्या प्रवाशांकडून प्रवासाच्या वेळी फरक वसूल करण्यात येणार आहे, असे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.
साधी-जलद रात्रसेवा हिरकणी
प्रवास भाडे जुने नवीन जुने नवीन जुने नवीन
मुंबई-कोल्हापूर ३८९ - ३९९ , ३९३ - ४०३, ५२८ - ५४१
मुंबई-रत्नागिरी ३१९ - ३२७, ३२१ - ३२९, ४३२ - ४४३
मुंबई-पंढरपूर ३७८ - ३८७, ३८१ - ३९०, ५१२ - ५२५
नागपूर-पुणे ७३२ - ७५०, ७३८ - ७५६, ९९२ - १०१७
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.