ईस्टर्न फ्री वेवर चार गाड्यांचा भीषण अपघात, ३ जण ठार

ईस्टर्न फ्री वेवर वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झालेत.  

Updated: Jul 19, 2016, 11:35 AM IST
 ईस्टर्न फ्री वेवर चार गाड्यांचा भीषण अपघात, ३ जण ठार  title=

मुंबई : ईस्टर्न फ्री वेवर वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झालेत. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर वाहनांची कोंडी झाली आहे. घाटकोपरकड़े जाणारी वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे.

दरम्यान,  ईस्टन फ्रीवेवरील वाहतूक बंद करण्यात आली असून कोंडीमुळे वाहतूक चेंबूर आरसीएफ येथून वळविण्यात आली आहे.
  
भरधाव इनोव्हा गाडीतील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला आपटली आणि दुसऱ्या बाजुला गेली. त्यामुळे इनोव्हा आणि टॅक्सीमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. इनोव्हाच्या चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून टॅक्सीला धडक दिली. यावेळी अन्य दोन गाड्याही एकमेकांना धडकल्या.

अपघातमुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. या अपघातामुळे घाटकोपरहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली.