मुंबईकरांसाठी चार गूड न्यूज फ्री

 मुंबईकरांना चार गुड न्यूज फ्री मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन मार्गाचं काम डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 

Updated: Aug 12, 2014, 11:39 PM IST
 मुंबईकरांसाठी चार गूड न्यूज फ्री title=

मुंबई :  मुंबईकरांना चार गुड न्यूज फ्री मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन मार्गाचं काम डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 

मुंबईकरांसाठी दुसरी गुड न्यूज म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी. अशोक यांनी तसे संकेत दिलेत. यापूर्वी गेल्या 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर 1 रूपया 9 पैशांनी कपात झाली होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाल्यानं आता पुन्हा एकदा पेट्रोल दरात कपात होण्याची शक्यता आहे.

तर सीएसटीच्या सर्वच्या सर्व 18 प्लॅटफॉर्मला जोडणा-या फुटओव्हर ब्रिजचं उद्घघाटनही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणार आहे.

या ब्रीजमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तर चौथी गुड न्यूज म्हणजे मुंबईतली पाणीकपात पूर्णपणे मागे घेण्यात आलीय.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

याआधी मुंबईची 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली होती. त्यानंतर आता उरलेली 10 टक्केही मागे घेण्यात आली. त्यामुळे आता मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.