मुंबई : फ्लेमिंगोचं आगमन झालं की त्यांना पहायला पक्षीप्रेमीचं गर्दी नेहमी होत असतं. लोकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन शिवडी जेट्टी येथे शनिवारी फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होत. बीएनएचएसने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मँग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हरसिटी फॉऊंडेशनच्या सौजन्याने या फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं.
हजारो फ्लेमिंगो आणि अन्य जातीचे शेकडो पाण पक्षी या निम्मिताने पक्षीप्रेमींना पाहता आले. दुपारपासून सुर्यास्तापर्यंत अनेक पक्षीप्रेमींनी हे गुलाबी पाहुणे पाहण्यासाठी शिवडी जेट्टी इथे गर्दी केली होती. पाण पक्ष्यांचे विश्व सामान्यांसमोर उलगडणे आणि त्यांच्यापर्यंत संवर्धनाचा संदेश पोहचवणे या दोन उद्दीष्टांसाठी फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन करण्यात आल्याचं बीएनएचएस तर्फे सांगण्यात आलं.