पहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट

गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता. 

Updated: Jul 2, 2014, 11:05 PM IST
पहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट title=

मुंबई : गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता. 

बघता बघता मेट्रो गाडीच्या आत पडणाऱ्या पावसाचा व्हिडीओ सोशल नेटवर्कींग साईटवर फिरायला लागला. मुंबई मेट्रो रेल्वे गाडीच्या वरताण गळत असल्यामुळे मुंबईकरांनी आश्चर्य व्यक्त केलं. याबद्दल अनेक तक्रारीही मेट्रो प्रशासनाला मिळाल्या. 

अखेरीस, या गाडीतला एअर कंडिशन खराब झाल्यामुळे त्याचं पाणी पडत असल्याचं स्पष्टीकरण मेट्रो प्रशासनानं देत यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘जोरात पाऊस आल्यावर 16 गाड्यांपैकी एक असलेल्या या गाडीचा एसी खराब होतो आणि त्याचं पाणी गाडीच्या आत पडत’ असल्याचं स्पष्टीकरण मेट्रोच्या प्रवक्त्यांनी दिलंय. ही गाडी आज दुरूस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आलीय. उद्या ही गाडी परत रूजू होणार आहे. 

The technical issue about leakage in metro was reported at 11.30 in morning.It has already been replaced and will be put to service tomorrow

— Mumbai Metro (@MumMetro) July 2, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.