शहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 03:46 PM IST
शहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर title=

मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यासाठी शहापूरच्या शेतकऱ्यांनी समृद्धी प्रकरणी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, पर्यायी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असं, आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं.