इव्हीएम मशिन खरी की खोटी, होणार फॉरेन्सिक टेस्ट?

इव्हीएम मशिनवर होणाऱ्या आरोपात किती तथ्य आहे, हे लवकरच कळणार आहे. कारण इव्हीएम मशिनची फॉरेन्सिक टेस्ट होणार आहे. हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही टेस्ट होईल. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2017, 10:05 AM IST
इव्हीएम मशिन खरी की खोटी, होणार फॉरेन्सिक टेस्ट? title=

मुंबई : इव्हीएम मशिनवर होणाऱ्या आरोपात किती तथ्य आहे, हे लवकरच कळणार आहे. कारण इव्हीएम मशिनची फॉरेन्सिक टेस्ट होणार आहे. हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही टेस्ट होईल. 

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर इव्हीएम मशिनची टेस्ट होणार आहे. पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते अभय छाजेड यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने हा आदेश दिला. 

छाजेड यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र लोकांनी त्यांना केलेल्या मतदानापेक्षा इव्हीएम मधील मतदान कमी असल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी मतदारांची प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केली.