www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या घरातली मोलकरीण काही दिवसांत तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मोलकरणींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नवा अभ्यासक्रम सुरू करतंय.
आता लवकरच स्मार्ट मोलकरणी तुमच्या घरात वावरायला लागणार आहे. कारण आता यशवंतराव मुक्त विद्यापीठानं खास मोलकरणींसाठी घर कामगार कल्याण पदविका हा एका वर्षाचा अभ्यासक्रम सुरु केलाय. मोलकरणींसाठीचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असणार आहे. त्यामध्ये डिश वॉशर कसा वापरायचा, व्हॅक्युम क्लिनर कसा वापरायचा, ओव्हन, फुड प्रोसेसर कसा हाताळायचा, या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसंच या अभ्यासक्रमात गणित आणि इंग्रजी विषयाचा समावेश करण्यात आल्यानं आता मोलकरणींना परदेशातल्या संधीही खुल्या होणार आहेत. मोलकरणींच्या या अभ्यासक्रमाबद्दल गृहिणींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यायत. पण मोलकरीण म्हंटल्यावर एक वेगळीच चिंता गृहिणींना सतावत असते.
मोलकरणींसाठी शिक्षणाची सोय होणं, हे त्यांच्या विकासासाठी चांगलंच आहे. पण मोलकरणींनो, दांड्या मारू नका, हे शिकवण्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे का, हा प्रश्न गृहिणी विचारतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.