स्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!

मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 2, 2013, 08:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या आदिवास्याना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.
राज्याची आर्थिक नगरी मुंबईच्या आरे कॉलनीत राहणारे आदिवासी. गेली ६५ वर्षे त्यांच्या आयुष्यात जणू काही अंधार पसरला होता... देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वीज नसल्यानं मूलभूत आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या.... अखेर ६५ वर्षाची प्रतीक्षा संपलीय... दिवाळीच्या दिवशी या आदिवासींच्या घरात वीज आलीय... त्यामुळं त्यांचं जीवन प्रकाशाच्या उत्सवाप्रमाणे तेजोमय झालंय...
या आदिवासींच्या घरी दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा करायला मिळालाय. हे वीजेच कनेक्शन मिळाल्यान माहापलिकेच पाणी घरात लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

या आदिवासींच्या पाच पिढ्या वीजेचा हक्क मिळवण्यासाठी लढत होते. अखेर त्यांचा हा लढा यशस्वी झाला.. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी वीज मिळवण्यासाठी ६५ वर्षे लढा द्यावं लागणं याहून मोठं दुर्दैव ते कोणतं?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.