ई टेंडरिंगमध्ये पळवाट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे घुमजाव

ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 255 कोटी रुपयांची कामे देताना त्याचे तुकडे केल्याप्रकरणी झी मीडियाने काल कागदोपत्री पर्दाफाश केला होता. मात्र असे काहीच झाले नसल्याचा पावित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

Updated: Jan 11, 2017, 08:02 PM IST
ई टेंडरिंगमध्ये पळवाट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे घुमजाव title=

मुंबई : ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 255 कोटी रुपयांची कामे देताना त्याचे तुकडे केल्याप्रकरणी झी मीडियाने काल कागदोपत्री पर्दाफाश केला होता. मात्र असे काहीच झाले नसल्याचा पावित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

पंकजा मुंडे यांच्या दाव्यानुसार एका कामाचे तुकडे करू नयेत असे आपण आदेश विभागाला दिले होते. त्याचप्रमाणे कामाचे तुकडे झालेले नाहीत. 255 कोटी रुपयांच्या गावांतर्गत कामांच्या मी निविदा काढल्या नाहीत. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी जबाबदारी ढकलली आहे.

दुसरीकडे 255 कोटी रुपयांची गावांतर्गत विकास कामे काही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही जिल्हा परिषदांकडे तर काही मजूर संस्थांकडे वर्ग केल्याचा दावाही त्यांनी केलाय. ग्रामविकास मंत्र्यांच्या या दाव्यामुळे कामाचे तुकडे कुणी केली आणि त्याप्रकरणी कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.