www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
महागाईचा फटका गणेशोत्सवालाही बसलाय. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल लालबागच्या राजाच्या मंडपात. लालबागच्या राजाचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घटलंय.
रोख रक्कम आणि दागिने भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात राजा वाहतात. पण यंदा त्यात घट आल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षी राजाच्या दानपेटीत फक्त ६ कोटी ७७ लाख जमा झालेत. गेल्यावर्षी हीच संख्या ८ कोटींच्या घरात होती. तर ११ किलोंचेच दागिने जमा झालेत. गेल्यावर्षी हीच संख्या १५ किलोंच्या घरात होती.
यंदा भाविकांच्या संख्येतही घट पाहायला मिळाली. यावर्षी दीड कोटी भाविकांनी राजाचं दर्शन घेतलंय. गेल्यावर्षी मात्र सव्वाकोटी भाविकांनी दर्शन घेतलं होतं. याचाच अर्थ भाविकांच्या संख्येत वाढ झाली तरीही यावर्षी राजाच्या दानपेटीत फारशी संपत्ती जमा झालेली नाही. यंदा उत्सवही १० दिवसांचा होता. अकराव्या दिवसाऐवजी दहाव्या दिवशीच विसर्जन मिरवणूक झाली, त्याचाही परिणाम दानपेटीवर झाला असण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.