खुशखबर! मुंबईत आता बस समुद्रावर चालणार

मुंबई: (एहसान अब्बास, प्रतिनिधी) -  मुंबईत रस्त्यानंतर आता समुद्रातही बस धावणार आहे. बेस्टनं मुंबईत 'डक बस' सुरू करण्याची तयारी चालवलीय. ही डक बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. डक बस सुरू झाल्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल. 

Updated: Jul 17, 2014, 05:02 PM IST
खुशखबर! मुंबईत आता बस समुद्रावर चालणार  title=

मुंबई: (एहसान अब्बास, प्रतिनिधी) -  मुंबईत रस्त्यानंतर आता समुद्रातही बस धावणार आहे. बेस्टनं मुंबईत 'डक बस' सुरू करण्याची तयारी चालवलीय. ही डक बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. डक बस सुरू झाल्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल. 

परदेशामध्ये अशा प्रकारची डक बस सेवा आधीपासूनच सुरू आहे. त्याच धर्तीवर मुंबईत डक बस सुरू करण्याची योजना आहे. बस पाणी आणि रस्ता दोन्हीवर चालते. प्रयोग म्हणून सुरूवातीला गेट-वे ऑफ इंडिया ते कुलाबा ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. डक बसनं गेट वे ते कुलाबा जायला 20 मिनिटं लागतील. तर 100 ते 150 रुपये याचं तिकीट असेल. 

डक बस समुद्रात 10 किलोमीटर प्रति तास या गतीनं चालेल. तर रस्त्यावर याची गती 50 किलोमीटर प्रति तास असेल. डक बसमुळं मुंबईकरांना तर फायदा होईलच सोबतच यामुळं मुंबई पर्यटनाला फायदा होईल. 

मुंबईत डक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न 2009पासून सुरू आहे. मात्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी दिलेल्या आश्वासनानंतर आता ही सेवा सुरू होणार आहे. एकूणच आता मुंबईत डक बस सुरू होण्याचं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.