www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू झालीय. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे. त्यामुळे कारवाई करत पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तिघांना अटक केलीय. यांच्याकडून पोलिसांनी १३ किलो प्रतिबंधित असलेलं ‘केटामाईन ड्रग्स’ हस्तगत केलंय. याची बाजारात किंमत ४६ लाख रुपये आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी हे ड्रग्स मुंबईत आणण्यात आलं होतं.
दरम्यान, नवीन वर्षाचं स्वागत आणि थर्टी फस्ट पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवलाय. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ३ हजार ५५० पोलीस, ५५० महिला पोलीस, ७० पोलीस निरीक्षक, २ महिला पोलीस निरीक्षक, ७० सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक, १२० सहाय्याक पोलीस निरीक्षक, २ सहाय्याक पोलीस आयुक्त, २ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, १०० होमगार्डचे अधिकारी आणि १००० होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या शिवाय लोकल पोलीस बंदोबस्तासाठी असणारच आहेत, आणि सर्व पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहे़त.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.