मुंबई : एमआयएम ही संघटना देशासाठी, राज्यासाठी आणि मुस्लिम तरुणांसाठी विघातक अशी संघटना आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जचा पुरवठा करून जवळ केले जाते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी झी मीडियाकडे केला.
वांद्रे पूर्व मधून वडील नारायण राणे यांचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर झी मीडियाचे रिपोर्टर रौनक कुकडे यांच्याशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक आरोप केला.
एमआयएम ही संघटना मुस्लिम तरूणांना बिघडविण्याचे काम करीत आहे. तरूणांना एमडी ड्रग्ज, चरस, गांजा अशा ड्रग्जचा पुरवठा करते. एमआयएमचे नेते ही कामे करतात. माझा हा आरोप वाटत असेल तर सत्यता पडताळून पाहण्यासाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची ड्रग्ज चाचणी करावी, सत्य समोर येईल, असाही दावा नीतेश राणे यांनी केला.
वांद्रे निवडणुकीत ड्रग्ज वाटल्याचे आम्ही स्वतः पाहिले आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जच्या माध्यमातून आपल्याकडे ओढणे हे एमआयएमचे काम आहे, असेही राणे म्हटले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.