मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसलं ड्रोन

गो एअर एअरक्राफ्टच्या एका पायलटने मुंबई एअरपोर्टवर ड्रोन उडतांना पाहिला आहे.

Updated: Jan 29, 2017, 12:09 PM IST
मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसलं ड्रोन title=

मुंबई : गो एअर एअरक्राफ्टच्या एका पायलटने मुंबई एअरपोर्टवर ड्रोन उडतांना पाहिला आहे. शनिवार सकाळी 12 हजार फूट उंचीवर हे ड्रोन दिसलं. सफेद रंगांच्या या ड्रोनचे 4 रोटोर्स होते आणि ते एअरक्राफ्टपासून 2 किमी अंतरावर उडत होतं.

याआधी ही एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना असेच ड्रोन दिसले आहेत. पण शनिवारी पहिल्यांदाच इतक्या उंच हा ड्रोन आढळला आहे. जेव्हा फ्लाईट जी8-141 नागपूरहून मुंबई एअरपोर्टवर लँड होत होती तेव्हा पायलटला हे ड्रोन दिसलं. इतक्या उंच हे ड्रोन पाहिल्यानंतर पायलटला ही धक्का बसला.