www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
६ डिसेंबरला साजरा होणा-या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी आणि परिसरात जोरदार तयारी करण्यात आलीय. या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीन चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्याशी तैनात करण्यात आल्यात.
दरम्यान, येथे आलेल्या बाबांच्या अनुनयांची गैरसोय होऊ नये, म्हणून वनमंत्री पतंगराव कदम आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज चैत्यभूमीवर सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. उद्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर प्रचंड भीमसागर उसळणार आहे. त्यासंबंधी पालिकेने केलेल्या सुविधांची पाहणी पतंगराव आणि उदय सामंत यांनी केली. यावेळी नारायण राणे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं पतंगरावांनी स्पष्ट केलंय.
आरपीआय ६ डिसेंबरला इंदू मिलमध्ये आत जाऊन स्मारकाचं भूमीपूजन करणार आहे. मात्र हा एक निव्वळ राजकीय स्टंट असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ