मुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत डोन्ट ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह मोहिम  जोरात सुरु केलीय. तशी ही मोहिम वर्षभर राबवली जाते. पण वर्षाच्या या शेवटच्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलीस ही मोहीम विशेष रुपात राबवतात. त्यामुळे झी मीडियाही मुंबईकरांना आव्हान करतं की, फक्त याच आठवड्यात नाही तर कधीच दारु पिऊन गाडी चालवू नका. कारण जिवन अमूल्य आहे.

Updated: Dec 29, 2015, 09:05 AM IST
मुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?  title=

अजित मांढरे, मुंबई : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत डोन्ट ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह मोहिम  जोरात सुरु केलीय. तशी ही मोहिम वर्षभर राबवली जाते. पण वर्षाच्या या शेवटच्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलीस ही मोहीम विशेष रुपात राबवतात. त्यामुळे झी मीडियाही मुंबईकरांना आव्हान करतं की, फक्त याच आठवड्यात नाही तर कधीच दारु पिऊन गाडी चालवू नका. कारण जिवन अमूल्य आहे.

मुंबईत दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर अंकुश आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न मुंबई पोलिसांनी केले. मात्र त्यांना त्यात म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. 

- २०१३ मध्ये दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या १६ हजार ५२५ जणांवर तळीरामांवर कारवाई केली गेली

- २०१४ मध्ये हा आकडा होता १६ हजार ०१३

- तर २०१५ मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंतच हा आकडा पोहोचला १६ हजार ८६४ वर... यात १८ ते ३० वयोगटातल्यांची संख्या जास्त आहे हे विशेष

दारु पिवून गाडी चालवणा-यांची संख्या वाढलीय तशी कारवाईच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. 

- २०१३ मध्ये ४ हजार ९७३ जणांवर दंडा बरोबरबरच गुन्हाही दाखल केला गेला. यातून ३ कोटी ९३ लाख ३८ हजार ३०० रुपये दंड रुपात वसूल करण्यात आले. ३ हजार ४२२ जणांचं ड्रायविंग लायसन्स रद्द करण्यात आलं

- २०१४ मध्ये साली ४ हजार ५३३ गुन्हे दाखल केले गेले. ३ कोटी ७० लाख ४२ हजार ८०० रुपये दंड म्हणून वसूल झाला. आणि ३ हजार १८९ जणांचं लायसन्स रद्द करण्यात आलं

- २०१५ मध्ये नोव्हेंबरपर्यंत ४ हजार ७८५ तळीरांमावर गुन्हे दाखल करुन दंडापोटी ३ कोटी ७३ लाख ९२ हजार २०० रुपये वसूल करण्यात आले. तर १ हजार ७८४ तळीरामांचं ड्रायविंग लायसन्स रद्द केलं गेलं

अशीच कडक कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचं मुंबईच्या पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी म्हटलंय.  त्यामुळे मुंबईकरांनो नवीन वर्षाचं स्वागत जरुर जल्लोषात करा. पण दारु पिऊन गाडी चालवू नका आणि जर दारु प्याल्यानंतर प्रवास करणं भागच असेल, तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा स्वत:ची गाडी असेल तर ड्रायवर किंवा इतर कोणाला तरी सोबत घेऊन जा, ही विनंती...