सावधान ! रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

पोटात काहीही नसतांना काही पदार्थ खाल्ले तर ते तुमच्या पचनसाठी चांगलं नसतं, काही पदार्थांमध्ये आम्ल असल्याने पोटातील आतड्यांना याचा त्रास होऊ शकतो.

Updated: Sep 10, 2015, 10:09 PM IST
सावधान ! रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका title=

मुंबई : पोटात काहीही नसतांना काही पदार्थ खाल्ले तर ते तुमच्या पचनसाठी चांगलं नसतं, काही पदार्थांमध्ये आम्ल असल्याने पोटातील आतड्यांना याचा त्रास होऊ शकतो.

1. सोडा
सोड्यात उच्च प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं, जेव्हा हा सोडा पोटातील आम्लात मिसळतो, तेव्हा पोटदुखीच्या समस्या सुरू होतात.

2. टोमॅटो
पोट खाली असतांना कच्चा टोमॅटो खाणे कधीही धोकादायक आहे.
कच्चे टमाटर खाने के कई फायदे होते हैं लेकिन खाली पेट कच्चे टमाटर खाना नुकसानदायक हो सकता है. टोमॅटोत असलेली आम्लता पोटात गॅस्ट्रोइंटस्टानइल अॅसिड सोबत क्रिया एक जेल तयार करते, त्यामुळे पोटदुखीच्या समस्या वाढतात. 

3. औषधी
आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात, काही खाल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, आपल्या घरात देखील हेच सांगितलं जातं.

4. अल्कोहोल
काही लोकांना काहीही न खाल्ल्याशिवाय अल्कोहोल घेणे पसंत असते, भारतात हा प्रकार जास्त दिसून येतो. मात्र पोट खाली असतांना अल्कोहोल घेतलं तर आतड्यांना मोठी इजा होऊ शकते.

5. मसालेदार पदार्थ
जास्तच जास्त लोकांना मसालेदार आणि चटपटीत खाणं आवडतं,  मात्र अशा गोष्टींना खाली पोटी घ्यायला नको, ज्याचा पोटावर मोठा परिणाम होईल, यामुळे आतड्यांना मोठी इजा होते.

6. कॉफी
पोटात काहीही नसतांना कॉफीचं सेवन तसं धोकायदायकचं आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय असेल, तर उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्या आणि मग कॉफी घ्या, कॉफी प्रमाणे चहाचं देखील असचं असतं, चहा जास्त पिल्याने गॅस, अॅसिडीटीच्या प्रकारांची शक्यता वाढते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.