`महाराष्ट्र देशा`... शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर?

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे लिखित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तीस हजार विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 13, 2012, 08:26 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे लिखित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तीस हजार विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विरोधकांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला असून पुस्तक वाटायचं असेलं तर शिवसेनेनं स्वत:च्या खर्चातून ती वाटावीत, अशी टीका काँग्रेसनं केलीय.
सत्ताधारी शिवसेना-भाजपनं पालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव तयार केला असला तरी या निर्णयाविरोधात आता वातावरण तापू लागलंय. महापालिकेच्या खर्चातून ही पुस्तकं विकत घेऊन विद्यार्थ्यांना द्यायला विरोधकांनी विरोध केलाय. शिवसेनेनं स्वखर्चातून अशी पुस्तकं वाटावीत, असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर या पुस्तकांमुळं पालिकेला आर्थिक बोजा पडणार नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा बोजवारा उडत असल्याचं दिसून येतंय. आता महाराष्ट्र देशा पुस्तक वाटपाचं काय होतंय. ते पाहणं महत्वपूर्ण ठरेल.