मुंबई : जनतेच्या कामांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता हरवत चालली असून जबाबदारीची जाणीव उरलेली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
निराश झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या करण्याबाबत एसएमएस येतो. तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो. ते पावले उचलतात आणि समस्या सुटते. मग बाकीचे कर्मचारी कशासाठी, कशासाठी आहेत, असे सवाल उपस्थित केला.
हे काम खालचे कर्माचारी करू शकतात त्यासाठी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची गरज कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना दिली.