झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशननंतर राधे माँ विरुद्ध धर्मरक्षक महासंघाकडून तक्रार

स्वयंघोषित देवीचा अवतार म्हणवणाऱ्या सुखविंदर कौर उर्फ राधे माँच्या  अडचणीचत वाढ होतेय. अंधविश्वास पसरवणे आणि धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याच्या आरोपा खाली कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये एक नवी तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Updated: Aug 23, 2015, 04:55 PM IST
झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशननंतर राधे माँ विरुद्ध धर्मरक्षक महासंघाकडून तक्रार title=

मुंबई: स्वयंघोषित देवीचा अवतार म्हणवणाऱ्या सुखविंदर कौर उर्फ राधे माँच्या  अडचणीचत वाढ होतेय. अंधविश्वास पसरवणे आणि धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याच्या आरोपा खाली कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये एक नवी तक्रार दाखल करण्यात आलीय. 

धर्मरक्षक महासंघाच्या रमेश जोशी यांनी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये राधे माँच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती. झी न्यूजनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत रमेश जोशींनी ही तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या संदर्भात आपला तपास सुरु केलाय आणि रमेश जोशींना दोन दिवसांत आपला जबाब नोंदवण्यास सांगितलंय

सुत्रांच्या माहितीनुसार कांदिवली पोलीस याप्रकऱणी लवकरच राधे माँ विरुद्ध एफआयआर दाखल करू शकतात.  

पाहा काय होतं ते स्टिंग ऑपरेशन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.