सर्वोत्तम राष्ट्रासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री

देशाला सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यात विचारवंत, साहित्यिक यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित सोळाव्या कोकण मराठी साहित्य सम्मेलनात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत कोमसाप साहित्य मित्र पुरस्कार वितरण करण्यात आले.

Updated: Nov 21, 2015, 05:34 PM IST
सर्वोत्तम राष्ट्रासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री title=

मुंबई : देशाला सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यात विचारवंत, साहित्यिक यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित सोळाव्या कोकण मराठी साहित्य सम्मेलनात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत कोमसाप साहित्य मित्र पुरस्कार वितरण करण्यात आले.

या वर्षी कोमसाप तर्फे केसरी पाटील, शरद पाटील, शोभाताई सावंत, दत्तात्रय मसुरकर यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यानी कोकणच्या साहित्यिकांचे कौतुक केले. शिवाय कोमसापला भविष्यात गरजेनुसार मदत लागली तर सरकारतर्फे सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले.

मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्ययात्रेचे दादर इथं संमेलनाच्या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं.  कोकण मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी या साहित्ययात्रेचे स्वागत केलं.

केशवसूत यांच्या सिंधुदुर्गातल्या करूळ या गावाहून निघालेल्या यात्रेने कोकणमार्गे प्रवास करत साहित्य संमेलनाची वातावरण निर्मिती केली. स्वागत झाल्यावर संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश करतांना अशोक नायगांवकर यांनी मराठी भाषेवर लिहिलेली कविता म्हणत सहभागी सर्वांनी संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.