शीना बोरा करत होती इंद्राणीला ब्लॅकमेल : सीबीआय

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीनाच्या हत्येमागे केळ पैसा हे एकमेव कारण नव्हते तर शीनाकडून इंद्राणीला वारंवार केले जाणारे ब्लॅकमेलिंग आणि तिचे राहुलशी असलेले संबंधही हत्येस कारणीभूत होते, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Updated: Nov 21, 2015, 03:07 PM IST
शीना बोरा करत होती इंद्राणीला ब्लॅकमेल : सीबीआय title=

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीनाच्या हत्येमागे केळ पैसा हे एकमेव कारण नव्हते तर शीनाकडून इंद्राणीला वारंवार केले जाणारे ब्लॅकमेलिंग आणि तिचे राहुलशी असलेले संबंधही हत्येस कारणीभूत होते, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

शीना हत्याप्रकरणात पीटर मुखर्जीचाही सहभाग, असेही या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. शीनाच्या हत्येमागे केवळ पैसाच नव्हे तर शीनाचे राहुलशी असलेले संबंध आणि शीनाकडून इंद्राणीला दिली जाणारी धमकी ही देखील कारणे होती, असे अधिकारी म्हणाला. सध्या पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली असून त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत देण्यात आली आहे.

अधिक वाचा - शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीला अटक

शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०१२मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. त्यानंतर रायगडजवळील जंगलात तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.