कल्याण : धुळे आणि जळगाव या एकाच ट्रॅकला येणाऱ्या दोन जिल्ह्यांसाठी मिळून एकतरी स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांकडून होत आहे.
इंग्रजांच्या काळापासून खानदेशला अजून एकही स्वतंत्र एक्सप्रेस मिळालेली नाही. खानदेशवासियांना रेल्वे मंत्र्यांकडून फार मोठ्या अपेक्षा असल्याचं यावेळी विश्वासराव भोसले यांनी सांगितलं.
चाळीसगावहून धुळ्याकडे सीएसटी-अमृतसरचे तीन डबे सकाळी जातात, ते धुळ्यातील प्रवाशांना पुरत नाहीत, म्हणून यावेळेत धुळे आणि जळगावसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी दादर-धुळे रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती, पण तिची वेळ प्रवाशांना थोडीही सोयीस्कर नव्हती, ती गाडी पुन्हा सुरू करण्याचीही मागणी होत आहे.
पाचोरा कृऊबा समितीचे संचालक विश्वासराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी ही मागणी केली आहे. यावेळी मोल या आहिराणी सिनेमाचे दिग्दर्शक योगेश कुलकर्णी देखील उपस्थित होते.
दादर-भुसावल सुपर फ़ास्ट एक्सप्रेस तसेच महानगरी, सचखंड, विदर्भ पंजाब.हावड़ा. राजेंद्रनगर एकस्प्रेस यांना पाचोरा येथे थांबा द्यावी अशीही मागणी होत आहे.