तुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!

बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 22, 2014, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
रिझर्व बॅंकेनं आज एका निवेदनाद्वारे ही माहिती दिलीय.... 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला रिझर्व बॅंक किंवा कोणत्याही बॅँकेतून आपल्याला जुन्या म्हणजेच 2005 पूर्वीच्या नोटा बदलून नव्या नोटा घेता येतील. अर्थात 2005 पूर्वीच्या नोटा ओळखायच्या कशा याबाबतही रिझर्व बॅकेनं मार्ददर्शन केलंय.....
2005 नंतरच्या नोटांच्या मागच्या बाजूला ती छापली गेल्याचं वर्ष नोंद केलेलं आहे. ज्या नोटांच्या मागच्या बाजूला नोट छापल्याचं वर्षाची नोंद नसेल अशी नोट 2005 पूर्वीची आहे. त्यामुळे अशा नोटा ग्राहकांना बदलून घ्याव्या लागतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.