अमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे?

सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय. 

Updated: Oct 9, 2015, 10:45 AM IST
अमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे? title=

मुंबई : सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय. 

२६/११ दहशतवादी हल्ल्यात डेव्हिड हेडलीने रेकी करुन दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २६/११ दहशतवादी हल्ल्यासंबंधी सध्या अबू जुंदालवर खटला सुरु आहे. अबू जुंदाल आणि हेडली हे २६/११ चे प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे जुंदालसोबतच डेव्हिड हेडलीचीही साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवावी, अशी मागणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात केलीय. 

पाकिस्तानी तसंच अमेरिकेचा नागरिक असलेला डेव्हिड हेडली हा लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. त्यामुळे त्याची साक्ष व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे नोंदवण्यासाठी न्यायालयानं अमेरिकाच्या न्यायालयाला विनंती करावी, अशीही मागणी करण्यात आलीय. 

३५ वर्षीय रिचर्ड डेव्हिड हेडली याला अमेरिका न्यायालयाने २६/११ हल्ल्याप्रकरणी ३५ वर्षांची शिक्षा सुनावलीय. सध्या तो अमेरिकाच्या ताब्यात आहे. त्या आधारावर मुंबई पोलिसांनी डेव्हिड हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्याची मागणी सेशन्स कोर्टात केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.