काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरुन तणाव वाढला

 काँग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागावाटपावरुन तणाव  निर्माण झालाय. राष्ट्रवादीला 120पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नाही. मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

Updated: Aug 27, 2014, 08:45 AM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरुन तणाव वाढला title=

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागावाटपावरुन तणाव  निर्माण झालाय. राष्ट्रवादीला 120पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नाही. मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

2009 पेक्षा फक्त सहा जागा वाढवून देण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत. मंगळवारी काँग्रेस समन्वय समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल असं सांगत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या 120 जागा देण्याच्या दाव्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने 288 जागंसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत. आम्हीही सर्व जागासाठी दिल्लीतून परवानगी आली तर मुलाखती सुरू करू असा इशारा काँग्रेसने दिलाय.

काँग्रेसनं आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीने २८८ मतदारसंघातल्या इच्छूकांच्या मुलाखती सुरूच ठेवल्या आहेत. 288 मतदारसंघांसाठी पक्षाकडे जवळपास 1400 अर्ज आले आहेत. राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीच्या मुंबई मुख्यालयात कालपासून सुरू आहेत. काल कोकण-ठाणे-मुंबईतील मुलाखती झाल्या, तर आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मुलाखती होत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातून काल तटकरेंच्या घरातून कुणीही मुलाखतीला आले नाही. तर राष्ट्रवादीला रामराम करणारे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या जागी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी उमेदवारी मागितलीय. ठाणे शहरातून वसंत डावखरे यांचे नाव चर्चेत होते, मात्र ते मुलाखतीला न आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पश्चिम महाराष्ट्रातून दिग्गज नेत्यांसमोर कुणीही उमेदवारी मागितलेली नाही. बारामतीतून अजित पवार यांचाच अर्ज आलाय. मात्र आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघातून आर. आर. आबांसह रमेश शेंडगे यांनी उमेदवारी मागितलीय. आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मंगलदास बांदल यांनीही उमेदवारी मागितलीय. मोहळमधून लक्ष्मण ढोबळे यांच्यासह रमेश कदम यांनी उमेदवारी मागितली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.