'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू

मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.

Updated: Aug 26, 2014, 11:29 PM IST
'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू title=

मुंबई : मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.

मात्र, आता सर्व गोष्टींची पूर्तता झाली असून, येत्या काही दिवसांत पुणे मेट्रो प्रकल्पालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, याचा पुनरुच्चार केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी मंगळवारी मुंबईत केला. 

मुंबईतील मेट्रो-३ प्रकल्पाचे भूमिपूजन नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात बोलताना नायडू यांनी पुणे मेट्रोबद्दलही माहिती दिली.

ते म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी का मिळाली नाही, असे विचारले जात आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांनी काही गोष्टींची पूर्तता न केल्यामुळेच या प्रकल्पाच्या मंजुरीला वेळ लागला. 

मात्र, आता आवश्यक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच याही प्रकल्पाला केंद्र सरकार मंजुरी देईल. पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या भाषणात केंद्र सरकारने लवकरात लवकर पुणे मेट्रोला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.