मोदी सरकारविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेसचा मोर्चा

 मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा काढलाय.  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. मोर्चात सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

Updated: May 26, 2015, 01:25 PM IST
मोदी सरकारविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेसचा मोर्चा  title=

मुंबई/पुणे :  मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा काढलाय.  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी हा मोर्चा अडवला. मोर्चात सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

राज्यभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात मोर्चे काढलेत. मुंबईपाठोपाठ पुण्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन  केलय. केंद्र सरकार आणि भाजप मोदी सरकारची वर्ष पुरती साजरी करत असताना, पुणे काँग्रेसनं मात्र अच्छे दीनचं प्रथम पुण्यस्मरण साजरं केलं. मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराचा निषेध पुणे काँग्रेस नं अच्छे दीन चं प्रथम पुण्यस्मरण घालून केला.

त्यासाठी शहर काँग्रेसनं नरपतगीरी चौकात आंदोलन आणि निदर्शने केली. मोदी सरकारच्या एक वर्षाच्या काळात पुण्याला मेट्रो मिळाली नाही. आयआयएम मिळालं नाही. असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.